Ticker

6/recent/ticker-posts

बौद्धजन समितीला बाबासाहेबांनी धम्मदिक्षेसाठी लिहिलेलं पत्र.

आम्हाकं धर्मसारथी 

या पत्राची सुरुवात,

आम्हाकं धर्मसारथी बाबा ओकास वंदामि ( आमचे धर्मसारथी बाबा. आमच्यासाठी तुमच्या मनात थोडीशी जागा असू द्या. आम्ही तुम्हास वंदन करतो. ) मजकूर पुढील आशयाचा: " तुमचा प्रथम दीक्षा संभारंभ मुंबई ला होईल असे आपण जाहीर केलेत. (संभवनीय तारीख १३ ऑक्टोबर ) जर लुम्बिनी,कुशीनगर, सारनाथ,गया या किंव्हा भ. बुद्धांच्या जीवनाशी निगडित अशा इतर ठिकाणी होत असेल तर आमचे काही म्हणणे नाही. परंतु मुंबई हे ठिकाण त्या पैकी खासच नाही सर्व भारतीयांना सोईचे होईल असे नागपूर हे मध्यवर्ती ठिकाण आहे येथे शाखा हि आहे हा संभारंभ नागपूर ला झाला तर संपूर्ण खर्च केला जाईल या साठी पाच सदस्यांची शिष्टमंडळ आपली भेट घेऊन त्या वर चर्चा करायला आम्ही तयार आहोत. "

या  बाबासाहेबांकडून अविलम्ब प्रतिसाद मिळाला. 

पत्राचे उत्तर पुढील प्रमाणे आले. 

" मी, तुम्ही आरंभिले धर्माचे काम पाहून फार खुश झालो आहे. मुंबई हे मी निश्चित केलेले दीक्षा विधीचे स्थळ बदलण्याचे कारण नाही. परंतु याचा अर्थ असा नव्हे कि नाग-पूर ला येणार नाही. आमचे लोक ज्या ज्या ठिकाणी धम्मदीक्षा संभारंभ आयोजन करतील त्या त्या ठिकाणी मी आवश्य जाईल." बाबासाहेबानी केलेला बेत बदलणार नाही याची सर्वानाच कल्पना  होती. तेव्हा बाबासाहेबांशी मुंबई ला जा न त्यांची भेट घेऊन पूण:चर्चा करण्यात अर्थ नाही . या विचाराने सर्वांच्याच मनात उदासीनता डोकावू लागली. का कोण जाणे परंतु वामनराव यांना सारखे वाटत होते. कि, हा धर्म सोहळा नागपूर ला झाल्याविना राहणार नाही. तो नागपुरलाच होईलच. 

संदर्भ:- बाबासाहेबांची धम्मदीक्षा 

पृ. क्र. १० ते १२ प्रकाशन :- खेमराज धोंडबाजी हिरेखण 

- आंबेडकरी चळवळ टीम

Post a Comment

0 Comments