Ticker

6/recent/ticker-posts

बुद्धदूत सोसायटी ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया संघर्षमय इतिहास

बुद्धदूत सोसायटी ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चा इतिहास 

नागपूरला येताच श्री पंडित रेवारामजी कवाडे, श्री कोसरे इ. प्रतिष्ठित आणि तत्कालीन कार्योत्सुक मंडळींना पाचारण केले. सभा झाली आणि महाथेरो संघरक्खित यांना नागपूर येथे येण्यास विनंती करण्यात आली महाथेरो नागपूर ला यायला उत्सुक होतेच. त्यांना संधी हवी होती. ती संधी असा रीतीने चालून आली हे पाहून त्यांना इप्सित पूर्ण होणार याची आशा वाटू लागली. सन १९५५ साली जानेवारी महिन्याच्या एक तारखेला हे जगप्रसिद्ध बौद्ध भिक्षु भिक्खू संघरक्खित बुध्ददूत सोसायटी संस्थापक,संचालक आणि संस्थाधिपती महाथेरो नागपूर येथे आले त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. काही संस्थानी त्यांची धावती भेट घेतली. त्याकाळी वामनराव गोडबोले यांचे मेहुणे मणिरामजी सोमकुंवर हे इतवारी राहत असत. त्यांच्या घरी सभा घेण्यात आली आणि समितीची स्थापना झाली ती खालील प्रकारे,

 अध्यक्ष

 पंडित रेवारामजी कवाडे

 नागपूर 

 सरचिटणीस

 वामनराव गोडबोले 

 नागपूर 

 उपाध्यक्ष

 श्री. साळवे , श्री. कोसारे 

 नागपूर 

 कोषाध्यक्ष

 दशरथ पाटील

 राह. बेला तह. उमरेड 

 सरकार्यवाह

 राम तिरपुडे

 नागपूर 

 सदस्य

 मच्छिन्द्रनाथ धोटे, मनोहर शहाणे

 नागपूर 

जानेवारी ९ च्या नागपूर च्या "तरुण भारत" समाचार पत्रात बातमी झडकली. भ. बुद्धांचा हात नागपूर ला आहे. महाथेरो संघरक्खिताणी सांगितलेल्या गाथेच्या उल्लेखावरूनच तसेच दि. ५-५-१९५५ च्या "तरुण भारत" नागपूर वर्धा मार्गावरील केळझर येथे प्राचीन बौद्ध पीठ होते अशा आशयाचेही छापून आले. सिलोन मधील धर्मग्रंथ "महावंशात" "चक्रपुर" म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो ते चक्रपुर म्हणजे केळझर होय असा कयास केला जाऊ लागला. एकूण बौद्ध धर्म विषयक चर्चा या नागनगरीत वर्तमान पत्रातूनही सुरु झाली.

"भारत हा भगवान बुद्धांचा देश !" - डॉ बाबासाहेब आंबेडकर 

महाथेरो संघरक्खिताच्या वरळीच्या विहारात बाबासाहेब नेहमी जात असतं तेव्हा बाबासाहेबांची बौद्धधर्म विषयक संस्था असल्याची कल्पना कुणालाही नव्हती. एकदा अशीच बाबासाहेबांची भेट घेऊन चर्चा करीत असता वरळीच्या बुद्ध विहाराची वामनरावांनी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला, या वर बाबासाहेब म्हणाले, "भारत हा भ. बुद्धाचा देश! या देशात कुणीही यावे आणि आपली संस्था स्थापन करावी हे बरे नव्हे:! "

या वर्षीच्या वैशाख पौर्णिमेच्या महोत्सवात दरवर्षी प्रमाणे वारली येथे प. पूज्य. बाबासाहेब आले त्यांनी तेथे सभेत जाहीर केले, "भगवान बुद्धांच्या धर्मा विना या जगाला तरणोपाय नाही या धर्माच्या प्रसाराकरिता मी, बौद्धजन समितीची स्थापना केली  व तो रजिस्टर्ड केली आहे, बहुसंख्येने या समितीचे आपण सभासद व्हा . "

वस्तुतः बुद्धदूत सोसायटी ची स्थापना झाल्याची वार्ता मुंबईहून निघणाऱ्या प्रबुद्ध भारत या वृत्त पात्रात आलेली होती. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी प.पूज्य. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली धर्मप्रसार समंधीची आणि बौद्ध-जण समितीची घोषणा नियतकालिकात नंतर वाचावयास मिळाली. वामनराव आणि त्यांनी स्थापन केलेली बुद्धदूत सोसायटी च्या कार्यकर्त्यांच्या मनात बाबासाहेबाना बद्दल नितांत आदर ! सर्व कार्यकर्त्यांनी असा निर्णय केला कि रेवारामजी कवाडे आणि वामनराव यांनी मुंबई ला जावे आणि बाबासाहेबांची निवासस्थानी भेट घ्यावी त्याकाळी बाबासाहेब कुलाबा मधील "जयराज भवन" मध्ये वास्तव्य करीत. जे थोर विचारवंत असतात त्यांची लहान सहन कृती देखील किती अर्थपूर्ण आणि दूरदृष्टीपूर्ण असते हे त्यावेळी वामनराव आणि रेवारामजी यांनी पाहिलेल्या घटनेवरून समजते .जेव्हा वामनराव आणि रेवारामजी बाबासाहेबाना कडे गेले तेव्हा ते अतिशय प्रसन्न दिसले विद्येच्या तेजाने त्यांचे मुख झळकत होते आणि अतिशय व्यग्र ! ते चित्रे काढीत होते, त्यांनी काढलेली चित्रे नवागताना दाखविली. ती चित्रे होती चिमण्या कावळ्यांची ! त्यांना चित्रकला अवगत करायची होती कशासाठी ? तर भगवान बुद्धाचे आपण बत्तीस लक्षण युक्त सुरेख चित्र काढावे म्हणून बाबासाहेब चित्र काढण्याचे काम चालू होते, आपण विषय काढला तर बाबासाहेब रागावतील असा अंदाज होता आपण बोलू नये असेच वाटू लागले परंतु ज्या कामासाठी आपण एवढ्या दुरून आलो ते काम कसे टाळावे ? अखेर वामनराव हळूच तोलून मापून शब्दात म्हणाले, "बाबासाहेब, आम्हाला कल्पना नव्हती कि आपली संस्था आहे याची. नाहीतर आम्ही बुद्ध दूत सोसायटी ची शाखा नागपूर ला काढली नसती."

बाबासाहेब :- "तुम्ही माझ्याकडे यालाच याची मला कल्पना होती!"

चला, एकूण सूर बरा लागला. वामरावाचा धीर दुणावला. वामनरावांनी बाबासाहेबाना बौद्धजन समितीची घटना देण्याची विंनंती केली. यावर बाबासाहेब म्हणाले ,

' कसली घटना ! मीच आहे घटना ! मी सांगेन तसे काम व्हावे' वामनरावांच्या  रूपांतर हर्षत झाले. त्यांचा हर्ष पोटात मावेनासा झाला. पंच पक्वानांनी भरलेल्या ताटावर यथेच्छ भोजन केल्यावर खूप जेवण झाल्याचे जसे समाधान मिळावे तसे वामनरावाला झाले. पंडित रेवारामजी कवाडे आणि वाराव नागपूर ला आलेत आणि त्यांनी लागलीच आनंद टॉकीजच्या शेजारीच कोठारी मॅन्शन  मध्ये बुद्धदूत सोसायटी चे रूपांतर भारतीय बौद्धजण सोसाटीत करून धर्मप्रसाराचे काम सुरु केले. बाबासाहेबांची संस्था रजिस्टर्ड झालेली. तेव्हा पैश्याचे व्यवहार अतिशय खबरदारीच्या करायचे. त्यासाठी श्रीमती डॉ सविता आंबेडकर उर्फ माई यांचा भाऊ बी.एस.कबीर, भ.स.गायकवाड आणि सवादकार यांनीच नोंदणी करायची अशा बाबासाहेबांच्या सूचना. पण मुंबईहून नागपूर ला शाखा स्थापना करण्याची विनंती केली. साधारणतः पावती देताना दोन पावत्या लिहाव्या लागतात एक  आणि दुसरी देणगी देणाऱ्या साठी वामनरावांनी पावतीची तिसरी प्रत मुंबई साठी पाठवण्याची तरतूद सुचविली त्याच प्रकारे शंभर सदस्य होताच मुंबई ला मनीऑर्डर पाठवण्याचे हि आश्वासन दिले. बौद्धजण समितीचे काम अपार उत्साहाने चालू लागले नागनगरीत प्रत्येक गल्लीत चौकात लाऊडस्पिकर घुमू लागला सदस्यांची संख्या दिवसेंदिवशी वाढू लागली राजकारणात असलेल्या लोकांना हे बघवेनाअसे झाले विशेष करून श्री आवडे प्रभुतींनी दुसरी बौद्धजन समिती स्थापन केली श्री रामरातन जानोरकर हे या समितीचे सचिव होते मानके गुरुजींचे वडील बंधू हरिप्रसाद मानके हे देखील दुसऱ्या बौद्धजन समितीमध्ये अध्यक्ष म्हणून शामिल झालेत. ते इथेच थांबले नाहीत तर त्यांनी वामनरावांच्या विरुद्ध काळ्या करण्याचे हि कार्यस्थ रचलं त्यांनी बाबासाहेबाना चुकीची पत्रे लिहिण्यास सुरुवात केली जेणे करून वामनराव यांच्या हाथातील कारभार दुसऱ्या बौद्धजन समिती कडे जावा. त्यांनी प्रमुख आरोप असा केला कि वामनराव हे सदस्यांना पारखून समितीचे सदस्य बनवत नाहीत ते सगळे हरिजन लोकांना समिती मध्ये घेत आहेत आणि समितीचे पैसे मध्ये उलाढाड करत आहेत. परंतु बाबासाहेबानी जेव्हा नागपूर ला वामनरावस सर्व नीट विचारणा केली असता हरिप्रसाद मानके यांच्या सगळ्या लिहिलेल्या गोष्टी चुकीच्या व खोट्या निघाल्या वर बाबासाहेबानी त्यांना रागावल.

पुढील भाग लवकरच प्रकाशित करण्यात येईल. 

-आंबेडकरी चळवळ टीम 

Post a Comment

0 Comments