जेव्हा बाबासाहेब भगवान बुद्धांची अडीच हजारवी जयंती महोत्सव आयोजित करतात....
सन १९५६ साल म्हणजे जगातील अतिशय महत्वाचे वर्ष. भगवान बुद्धाची २५०० वि जयंती. साऱ्या भारतभर साजरे होणारे वर्षे सर्वच राज्यांना हि जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करावी अशी परी पत्रके. राज्या-राज्यांनी तशी समितीची स्थापना केली. त्यावेळी विदर्भ मध्यप्रदेशातच होता तशात नागपूर हे मध्यप्रदेश ची राजधानी होती, बौद्धजन समितीचे चाललेले कार्य पाहून प्रथम स्थापित झालेला बौद्धजन समितीच एक सदस्य शासनाचे जयंती समारोह समितीवर घेण्यात आला. या वर्षीच्या वैशाख पौर्णिमेला भ. बुद्धाच्या २५०० व्य जयंती निमित्त या समितीने शोभा यात्रा काढली. त्यात सारनाथ स्तंभ व त्यावरील सिंहमुखे असा एक देखावा तर दुसरा सांचीच्या स्तूप, तिसरा पिंपळ वृक्ष आणि त्याखाली भ. बुद्ध बसलेले! अशी विविध दृश्ये! इतकेच काय पण हत्ती, उंट हे देखील शोभा यात्रेत होते.
नागपूर मधील सर्व वर्तमान पत्रांनी या शोभायात्रे ची नोंद घेतली प. पूज्य. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नजरेतून हे विलोभनीय दृश्ये सुटली नाहीत. कारण कात्रणे व छाया चित्रे त्यांना पाठविण्यात आलीत. बाबासाहेबांनी घोषणा ऐकावयास मिळाली होती, "माझी दीक्षा मुंबई येथे होईल." हा दिवस होता २३ मे १९५६, मात्र दीक्षा स्वीकारण्यासाठी वेळ आणि तारीख अजूनही जाहीर केलेली नव्हती. यामुळे वामनरावांनी बौद्धजन समितीची सभा बोलविण्यात आली आणि या सव्हेट दीक्षा संभारंभासंबंधिचा ठराव पारित करण्यात आला या ठरावासमोर पत्र जोडले. पत्र वाचण्या साठी येथे क्लिक करा .
0 Comments