Ticker

6/recent/ticker-posts

बाबासाहेबांच्या एल्फिन्स्टन कॉलेजच्या "त्या" कटू आठवणी

त्याकाळी महार जमातीतल्या मुलाने मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण व्हावे हे आश्चर्य कारण त्या समाजाला शिक्षणाचा वाराही दुर्लभ होता शिक्षणापासून  अस्पृश्य समाज वंचित होता. त्यांना शिक्षणाची काय जरुरी. असे अस्पृश्याना वाटत तर आपल्याला शिकून काय करायचे आहे? अशी स्पृश्यांची विचारसरणी होती, "शिकवण बामणाघरी" अशीच भावना असपृश्य होती अशा परिस्थितीत बाबासाहेबानी हे जे यश मिळविले होते ते खरोखरच अघटित होते  म्हणूनच काही जाणत्या समाज सुधारकांनी एक सभा भरवून बाबासाहेबांचा सत्कार केला ! श्री. सी.के.बोले आणि कृष्णाजीपंत केळुस्कर यांनी त्या सभेत भाषण दिले व सभेत बाबासाहेबांचे कौतुक केले पुढील शिक्षण साठी प्रोत्साहान दिले.या प्रसंगी श्री केळुस्कर गुरुजींनी स्वतः लिहिलेले गौतम बुद्धाचे चरित्र बाबासाहेबांना भेट म्हणून दिले,  यात नसेल? कारण उत्तरायुष्यात बाबासाहेबांनी बौद्ध धर्मचाच स्वीकार केला. बाबासाहेब मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेज मध्ये दाखल झाले. तेथे महाविद्यालयीन शिक्षण घेऊ लागले रामजींना भीमराव आपल्या अपेक्षांची  पूर्ती करत आहे याचा मनोमनी आनंद होता, पण त्यांच्या तुटपुंज्या पेन्शनीत कॉलेज चा खर्च करताना त्यांची फार ओढाताण होऊ लागली. तरीही कॉलेज ची पहिली दोन वर्धे त्यांनी कशीबशी रेटली. भीमराव आंतर आर्ट्सची परीक्षा उत्तीर्ण झाले. रामजींचे आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन केळुस्कर गुरुजी यांनी चंदावरकरांच्या मार्फत बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांकडून दरमाह २५ रुपयांची शिष्यवृती भीमरावांकरिता मिळवत होती. भीमराव नेटाने अभ्यास करीत होते. नवे ज्ञान,नवे लोक,नवे जग, नवी माणसे ह्यांच्याशी परिचित होत होते. पण अस्पृश्यतेचे चटके येथेही बसत होते. कॉलेजमध्ये देखील त्यांना पाणी पिण्यास मिळत नसे, या काळातही भीमरावांचे अवांतर वाचन व शिक्षण सुरूच होते नाव-नवीन ज्ञानाची क्षितिजे मोठं मोठ्या ग्रंथातून ते धुंडाळीत होते १९१२ साली भीमराव बी.ए च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. 

केळुस्कर गुरुजीं
बी.ए झाल्यावर त्यांनी बडोदे सरकारच्या सैन्यात लेफ्टनंट म्हणून नोकरी पत्कारली रामजींना हे पसंत नव्हते मुलाने मुंबईतच राहावे आणखी शिकावे, सरकारी नौकरी करावी असे त्यांचे  पण भीमरावांनी आपला हट्ट सोडला नाही  बरोड्याला ८-१५ दिवसातच रामजी  झाल्याची भीमरावांना तयार भेटली भीमराव तडक मुंबई  परतले त्यांना पाहून  समाधानाने इहलोकीची (जीवनातल्या अखेरच्या क्षण) यात्रा संपवली. 
वडिलांच्या निधनाने दुःख भीमरावांना फार झाले त्यांच्या प्रेमाचा व एकमेव आधारच नष्ट झाला होता ! वडील गेले पण आता पुढे काय ? भीमरावांपुढे प्रश्न उभा राहिला कारण बरोडा नोकरीतील त्यांचा कटू अनुभव लक्ष्यात होता. पुढील शिक्षणासाठी पैसाही जवळ नव्हता दरम्यानच्या काळात त्या वेळच्या प्रमाणे भीमरावाचे लग्नही झालेले होते. त्या वेळी १७ वर्षे आणि रमाई वय ९ वर्षे होते त्यांचे वडील भिकू धुतरे हे दाभोळ बंदरावर हमालीचे काम करत असायचे.

- संकलन- आंबेडकरी चळवळ टीम 

संदर्भ :- डॉ आंबेडकर (ले. राजा मंगळवेढेकर)

पृष्ठ क्र . १४-१६ 

Post a Comment

0 Comments