जेव्हा बाबासाहेब धम्मदीक्षेला आलेल्या भिक्षूंना प्रश्न विचारतात ........
परित्राण पाठास पाच भिक्षु असावेत असे मानले जाते
१) भन्ते चंद्रमणी महास्थवीर, २)भन्ते सदित्सतस्स (श्रीलंका), ३)भन्ते संघरत्न (श्रीलंका), , ४) भन्ते प्रज्ञानंद (लखनऊ) परंतु अजून एक भिक्खू पाहिजे होते त्या साठी सांची येथी भन्ते प पञ्ञातिस्स (सांची) यांना बोलावण्यात आले, महास्थवीर चंद्रमणी हे कुशीनगर चे जेथे भगवान तथागत गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले. त्यांचा रक्षक म्हणून श्री. छत्रपती विठ्ठलराव रायपुरे यांना पाठविण्यात आले परंतु त्यांची भेट होऊ शकली नाही. महास्थवीर आपल्या शाळेतील एका अध्यापकाला घेऊन नागपूर ला पोचलेत. बाबासाहेबांची विशेष सूचना सगळ्या कार्यकर्त्यांना होतीच कि महास्थवीर चंद्रमणी आल्यावर त्यांच्या साठी विशेष देखभाल करण्यात यावी महास्थवीर दुपार पर्यंत येणार असा बाबासाहेबांचा आणि गोडबोले यांचा अंदाज होता म्हणून बाबासाहेबानी कार्यकर्त्यांना दुपारी १२ वाजता रेल्वे स्टेशन वर जायला सांगितले होते परंतु कार्यकर्ते लवकरच पोचलेत परंतु महास्थवीर आणि त्यांच्या शाळेतील अध्यापक दोघेही नागपुरात सकाळीच पोचले होते त्यांना शाम हॉटेल ला येण्यासाठी गाडी न मिळाल्याने ते संध्याकाळ पर्यंत स्टेशन बाहेर थांबलेत त्या नंतर त्यांना एक मोटार दिसली त्यात ते बसलेत व शाम हॉटेल ला पोचलेत तिकडे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी अजून हि रेल्वे स्टेशन च्या क्रमांक २ वर थांबलेले होते. महास्थवीर आणि अध्यापक दोघेही हॉटेल ला पोचलेत हॉटेल मध्ये राहण्याची सोय ची तय्यारी चालू होती महास्थवीर आत गेले वामनराव गोडबोले यांना कळताच त्यांनी स्वागतासाठी उभे असलेले कार्यकर्ते रेल्वे स्टेशन वरून बोलवून घेतलेत महास्थवीर आणि अध्यापकाचे स्वागत करण्यात आले व सगळे आप आपल्या शयन कक्षात आराम करण्यास गेलेत. बाबासाहेबांन साठी वेगडी मोटार गाडी आणि भिक्षु संघ करीत वेगडी मोटार गाडी ची सुविधा होती, भोजनाचा दरदिवशीचा मेन्यू स्वतः बाबासाहेब लक्ष देऊन आखत असत. भिक्खू दिवसातून एकदा आणि तेही दुपारी १२ वाजण्याच्या अगोदर जेवत असत. त्या नंतरच्या जेवणाला "विकालभोजन " असे म्हणून गणले जाते भिक्खुणी दसशील पाळण्याची असत त्यातील हे एक शील कि विकलं भोजन ग्रहण करायचे नाहीत. भोजनाचे ताट प्रत्येकाच्या खोलीत पाठविण्यात येई. चहाची व्यवस्था मात्र दुपारी व्हरान्ड्यात करण्यात येई तेथे सगळे भिक्खू आणि सगळे लहान मोठे कार्यकर्ते चहा प्यायला जमत असत. अर्थातच बाबासाहेबांच्या सांगण्याहून .
दि. १२ ओक्टोम्बरची गोष्ट त्या वेळी आंबिया बाराची संत्री असायची. भारतातील इतर भागातून आलेल्या मंडळींना नागपूरची संती म्हटलं कि नवलच वाटायचं बाबासाहेबांच्याही आवडीची नागपूर ची संत्री. म्हणून चहाच्या वेळी संत्रीही खायला ठेवली होती. आपापल्या खोलीतून भिक्खू वर्ग आणि कार्यकर्ते चहा प्यायला बःहेर आले. व्हरांड्यात येऊन जमलेत. बाबासाहेब आलेत सगळे खुर्ची वर बसलेत. संती बघताच महास्थवीर चंद्रमणी म्हणाले " मी चहा घेणार नाही, फक्त एक दोन संत्रीच घेतो. " महास्थवीर चंद्रमणी यांनी एक संत्र उचलले आणि त्याची वरची साल काढली व त्या संत्र्याचे २ भाग केले, एक फोड हातात घेऊन ती नीट करून खाण्या साठी उचलाच होता कि तेव्हड्यात बाबासाहेब म्हणाले "मी संघाची दीक्षा घेणार नाही , Sangha Is Very Corrupt."(संघ बदनाम झालेला आहे.)
महास्थवीर चंद्रमणी संत्र्याची फोड खाणार होते तेवढ्यातच बाबासाहेब च वाक्य ऐकून ठसकाच बसला इतर चारही भिक्खू अवाक झालेत, देवप्रिय वलनी सिन्हा यावर काही बोलतील असे वाटले परंतु ते सुद्धा या वर गप्प बसले होते महास्थवीर हाथातील संत्र्याच्या फोडी सकट त्यांचा हाथ प्लेट मध्ये आला.
पुन्हा बाबासाहेब त्याच विषयावर बोलू लागले, " I AM VERY SERIOUS ON THIS SUBJECT, I WANT YOUR DECISION BY TOMARROW." ( या बाबतीत मी गांभीर्याने विचार केलेला आहे, तुमचा निर्णय उद्या मला दुपारच्या चहा प्यायला यायचा वेळी हवाय. ")
चहा तस्साच गार ज्यांच्या तोंडचे या विधानाने पाणी पळाले तिथे चहा थंडगार होणारच !
सर्वे भिक्खूवर्ग आप आपल्या खोलीत गेले ते अनु-त्तरीत प्रश्न घेऊनच. प्रश्नाचे प्रश्नचिन्ह अंतर्मनात तसे चेहऱ्यावरही उमटलेच. कधीहि न विचार केला नसलेला असा महाभयंकर प्रश्न संघावर ! स्वतःवर प्रत्यक्ष शिंतोडे. संकोचाने माना खाली आल्यात !
असे झाले त मग जग काय म्हणेल ? हा प्रतिप्रश्न डिवचणारा. देवप्रिय वली सिन्हा हे भिक्खू नव्हते ते महाबोधी सोसायटीचे जनरल सेक्रेटरी. त्यांनी मनातील हि द्वंद्वे, नष्ट करण्याचा बेत रचला ते वामनरावाला म्हणाले,
"दीक्षाभूमी कहा है? हमे देखणा है, क्या आप हमें लेकर जायेंगे ?"
वली सिंन्हा सोबत चार भिक्खू त्यात महास्थवीर चंद्रमणी हि होते, सोबत वामनराव होतेच. गाडी सुरु झाली नॉर्मल स्कूल क्वाटर्स कडून वळली दीक्षाभुनी च्या मार्गाने गाडी लागली, वल्ली सिन्हाने पुनश्च तोच प्रश्न तोच प्रश्न समोर ठेवला.
दुसरा दिवस उगवला म्हणजे ओक्टोम्बर ची १३ तारीख, दुपारचे भोजन सगळ्यांच्या खोलीत झाले. जस-जशी चहाची वेळ जवळ येऊ लागली तस तशी भिक्खूंना वाटत असे आता काय होणार बाबासाहेबाना काय उत्तर द्यावं जर आपलं उत्तर चुकले तर बाबासाहेब आपल्याला काय बोलणार याच विचाराने भिक्कूची मने बैचेन होऊ लागली.
वेळ आपले काम कराला कधीच चुकत नसते. ती वेळ आली ठरलेल्या प्रमाणे दुपारी चहा प्यायला भिक्खू वर्ग आणि वलनी सिन्हा आणि बाबासाहेब आले.
बाबासाहेब म्हणाले
" I FEEL YOU MUST HAVE COME TO THE CONCLUSION" (तुम्ही सगळे उत्तर घेऊन आलेच असाल असे मला वाटते.)
बाबासाहेबानी वाक्य संपविलेच होते तेव्हड्यात वामनराव बोलले,
"बाबासाहेब मी काही बोलू काय? "
"काय?"
"संघ ,हणजे भगवान बुद्धांचा संघ, ज्या संघात, स्रोतगामी सवोत्तर, सकृदागामी, अनागामी, आणि अर्हत इ. पायरी पायरीने निर्वाण प्राप्तीच्या मार्गावर असतात. यात समाविष्ट आहेत, अशा संघाला वगळता येईल का ? "
तेवढ्यात बाबासाहेब म्हणाले,
"हे तुझ्या तोंडून मला ऐकायचे नव्हते, भिक्खू कडून मला हे ऐकायचं होतं."
महास्थवीर चंद्रमणी उपस्तिथीत भारतीय घटनेचे शिल्पकार जगविख्यात कायदे तज्ज्ञ अर्थशात्रज्ञ डॉ भीमराव आंबेडकर आणि त्यांच्या सह लाखो अनुयायी बौद्ध धम्माची दीक्षा घेणार होते. हे एक या विज्ञान युगातील जागतिक महत्व प्राप्त करून देणारे ऐतिहासिक महत्वकार्य. बाबासाहेब सोबत महास्थवीर यांचं नाव आज तितकेच अजरामर आहे कि आज पिढ्यान पद्यां त्यांच्य नाव कोणीही विसरू शकत नाही.
- द आंबेडकरी चळवळ टीम
संदर्भ- बाबासाहेबांची धम्मदीक्षा
ले- सुगंधा शेंडे (प्रकाशन- खेमराज धोंडबाजी हिरेखन नागपूर खटला रोड.)
0 Comments